esakal | भारताला विश्वकरंडक जिंकून देणारा गोलंदाज बजावतोय कर्तव्य, ICC कडून सलाम
sakal

बोलून बातमी शोधा

भारताला विश्वकरंडक जिंकून देणारा गोलंदाज बजावतोय कर्तव्य, ICC कडून सलाम

भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारताला विश्वकरंडक जिंकून देणारा गोलंदाज बजावतोय कर्तव्य, ICC कडून सलाम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चंदिगड : भारतीय क्रिकेट संघाला 2007 मध्ये टी-20 विश्वकरंडक जिंकून देणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा कोरोनाच्या संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आपले कर्तव्य निभावताना दिसत आहे. जोगिंदरच्या या कामाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) सलाम केला आहे.

भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात पोलिस नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत असून, रस्त्यावर आपले कर्तव्य निभावत आहेत. जोगिंदर शर्माही हरियाणा पोलिस दलात डीएसपी पदावर कार्यरत आहे.

जोगिंदर रस्त्यावर उतरून कर्तव्य निभावत असतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आयसीसीकडून त्याचे कौतुक करण्यात आले आहे. आयसीसीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की 2007 मध्ये भारताला टी-20 विश्वकरंडक जिंकून देणारा हिरो आणि 2020 मधील जगाचा खरा हिरो. क्रिकेट कारकिर्दीनंतर पोलिस अधिकारी म्हणून भारताचा जोगिंदर शर्मा खऱ्या अर्थाने जागतिक महामारीविरोधात लढत आहे.