

World Disablity Day
sakal
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये मंगळवारी आयोजित सन्मान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहिले. सकाळी साडेदहा वाजता पोहोचलेल्या सीएम योगी यांनी दिव्यांगजणांनी लावलेल्या प्रदर्शनाचे (Exhibition) अवलोकन केले. या सोहळ्यात ५०० दिव्यांगजणांना ट्रायसायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र (कान की मशीन) यांसह विविध सहायक उपकरणे प्रदान करण्यात आली.