महुर्त ठरला! 50 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्याचे या दिवशी होणार भारतात पुनरागमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheetah

महुर्त ठरला! 50 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्याचे या दिवशी होणार भारतात पुनरागमन

चित्ता, जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी आहे, भारतात नामशेष झाल्यानंतर जवळपास 50 वर्षांनीनंतर,17 सप्टेंबरला चित्त्याचे देशात पुनरागमन होणार आहे. चित्ता हा जमिनीवर धावणारा सर्वात वेगवान प्राणी मानला जातो. मध्य प्रदेशातील श्योपूर येथे चित्ते आणण्यात येणार आहेत. 17 सप्टेंबरला चित्ता भारताच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहे.

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून अनेक टप्प्या टटप्प्यांत 25 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 8 चित्ते आणले जातील. त्यांना मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो-पालपूर नॅशनल पार्कमध्ये ठेवले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या उद्यानातील चित्ता रिप्लेसमेंट प्रकल्पाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मध्य प्रदेशचे वन आणि पर्यावरण मंत्री विजय शाह शनिवारी कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात भेट देवून शहा यांनी या कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेतला. शाह म्हणाले, “अनेक प्रयत्नांनंतर आम्ही 17 सप्टेंबर रोजी नामिबिया, दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणत आहोत.

पंतप्रधान मोदी स्वतः त्यांच्या पुनर्वसनाची सुरुवात करणार आहेत. 'दक्षिण आफ्रिकेतून चित्ते कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात आणले जात आहेत, कारण भारतातून चित्ता नामशेष झाला आहे. येथे आल्याने जगभरातील लोक त्यांना पाहण्यासाठी येतील, त्यामुळे या परिसराच्या विकासासोबतच लोकांना रोजगारही मिळेल.

यावर केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे "म्हणाले की, चित्तांचे स्थानांतरण ही केवळ देशासाठीच नाही, तर जगासाठी एक ऐतिहासिक संधी आहे. चित्ता, वाघ किंवा आशियाई सिंहांचे स्थानांतरण हे सोपे काम नाही, कारण असे स्थानांतरण जगात फार कमी यशस्वी झाले आहे."

माहिती देताना केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव "म्हणाले की, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून 25 हून अधिक चित्ते वेगवेगळ्या टप्प्यात कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येणार आहेत, सुरुवातीला सप्टेंबरला या उद्यानात आठ चित्ते आणण्यात येणार आहेत."

Web Title: World Fastest Land Animal Make Comeback India Years Becoming

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..