World Hindi Diwas: महाराष्ट्रात भरलं होतं पहिलं जागतिक हिंदी संमेलन; जाणून घ्या 10 खास गोष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 10 January 2021

जगभरातील हिंदीवर प्रेम करणारे लोक 10 जानेवारी 'जागतिक हिंदी दिवस' (World Hindi Day 2021) म्हणून साजरा करतात.

नवी दिल्ली- जगभरातील हिंदीवर प्रेम करणारे लोक 10 जानेवारी 'जागतिक हिंदी दिवस' (World Hindi Day 2021) म्हणून साजरा करतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात हिंदीचा प्रचार-प्रसार करण्याचा आहे. तसेच हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळख देण्याचाही हेतू आहे. भारताचे दूतावास असणाऱ्या देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2006 मध्ये आजच्या दिवशी जागतिक हिंदी दिवसाची घोषणा केली होती. जागतिक हिंदी दिवस आणि हिंदी दिवसात फरक आहे. हिंदी दिवस 14 सप्टेंबरला साजरा केला जातो, तर जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारीला साजरा केला जातो.

प्रायव्हसीबाबत WhatsApp ला तगडा पर्याय; जगातील श्रीमंत व्यक्तीने सुचवलेल्या...

जाणून घ्या 10 महत्त्वाचे गोष्टी-

-जगभरात हिंदीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पहिले जागतिक हिंदी संमेलन 10 जानेवारी, 1975 ला महाराष्ट्रच्या नागपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात 30 देशांमधील 122 प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. 

- माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी 10 जानेवारी 2006 पासून जागतिक हिंदी दिवस साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली.

-परदेशात भारतीय दूतावासात जागतिक हिंदी दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विविध विषयांवर हिंदीमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. 

- नॉर्वेमध्ये पहिला जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला होता. 

-  जागतिक हिंदी दिवसाशिवाय दरवर्षी 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला होता. 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला राज्यभाषेचा दर्जा दिला होता. 

- सध्या जगातील अनेक विश्वविद्यालयांमध्ये हिंदी शिकवली जाते आणि जगभरात कोट्यवधी लोक हिंदी बोलतात. एवढंच नाही तर, हिंदी जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पाच भाषांमध्ये येते. 

- दक्षिण प्रशांत महासागरात फिजी नावाचे एक द्विप आहे. फिजीने हिंदीला अधिकारिक भाषेचा दर्जा दिला आहे. याला फिजियन हिंदी किंवा फिजियन हिंदुस्तानी म्हटलं जातं. ही भाषा अवधी, भोजपुरी आणि अन्य भाषांचे मिश्रण आहे. 

- पाकिस्‍तान, नेपाल, बांग्‍लादेश, संयुक्‍त अरब अमीराती, युगांडा, अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, न्‍यूजीलँड, गुयाना, सूरीनाम, त्रिनिदाद, साउथ अफ्रीका आणि मॉरिशससह अनेक देशात हिंदी बोलली जाते. 

- जागतिक आर्थिक मंचच्या गणनेनुसार हिंदी जगातील 10 शक्तीशाली भाषांपैकी एक आहे. 

-2017 मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीत पहिल्यांदाच 'अच्छा', 'बड़ा दिन', 'बच्चा' आणि 'सूर्य नमस्कार' अशा शब्दांचा समावेश करण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Hindi Day 2021 know 10 interesting things about 10 January