
भोपाळ : ‘‘ पर्यावरण, अपारंपरिक ऊर्जा यासह विविध क्षेत्रातील कामगिरीबाबत जग भारताबाबत प्रचंड आशावादी आहे. जगभरातील सामान्य व्यक्ती असो, धोरणकर्ते, विविध देशांतील तज्ज्ञ किंवा संस्था असो, या सर्वांना खूप आशा आहेत आणि त्यांना आपल्याबाबत एवढी उत्सुकता असण्याची इतिहासातील पहिलीच वेळ असावी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.‘ इन्वेस्ट मध्य प्रदेश-ग्लोबल इन्वेस्टर्स समिट-२०२५’ चे उद््घाटन करताना ते बोलत होते. या परिषदेचा उद्देश व्यापक प्रमाणात गुंतवणुकीचा ओघ वाढविण्याचा आहे.