
जगभरात मांस उत्पादनासाठी डुक्कर पालन हा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सध्या जगभरात डुकरांची लोकसंख्या सुमारे ७८ कोटी आहे. जगात सर्वाधिक डुकरे चीनमध्ये आढळतात. जगातील एकूण डुक्कर लोकसंख्येच्या जवळपास निम्मा भाग चीनमध्ये आहे. आकडेवारीनुसार, चीनमध्ये सुमारे ४०-४५ कोटी डुकरे आहेत. चीननंतर डुक्कर पालनात युरोपियन युनियन (विशेषतः जर्मनी, स्पेन, डेन्मार्क, फ्रान्स, पोलंड) आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. आशियामध्ये चीननंतर व्हिएतनाम आणि फिलिपाइन्सचा नंबर लागतो.