
World Pizza Day 2023 : पिझ्झाची interesting कहाणी; जेवणाला कंटाळलेल्या राणीसाठी बनवला होता डुक्कर पिझ्झा!
रोज जेवणाला काय बणवावं आणि रोज रोज काय हेच खायचे अशी तक्रार जेवण बनवणारी आई आणि तेच जेवण खाणारे घरातले सदस्यांची असते. आईने काहीतरी नवे करावे, हॉटेलात मिळणारे पदार्थ, पिझ्झा बर्गर खायला घालावेत असे सर्वांनाच वाटत असते.
अशाच प्रकाररच्या कृतीतून पिझ्झाचा जन्म झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, एका राणीच्या हट्टापायी पिझ्झा बनवण्यात आला. आज जागतिक पिझ्झा डे आहे. त्यामूळेच त्याचा इतिहास जाणून घेऊयात.
पिझ्झाचा इतिहास फार प्राचीन काळापासूनचा आहे. हा पदार्थ सुरुवातीला इजिप्शियन आणि त्यानंतर इटालियन खाद्यसंस्कृतीमध्ये पहावयास मिळत असे. ९७ सालापासून इटलीमध्ये हा पदार्थ बनविला जात असल्याचा उल्लेख सापडतो. त्याकाळी, पोळीप्रमाणे दिसणाऱ्या बेसवर तेल, काही मसाले, कोथिंबीर, बेसिल किंवा तत्सम पाने, आणि चीझ घालून हा पदार्थ तयार केला जात असे.

पिझ्झाचा प्रवास इजिप्त, इटलीवरून भारतात पोहोचला असला तरी १८ व्या शतकात इटलीमधील नेपल्स शहरात रॉफ़ेल एस्पिऑसिटोनं या आधुनिक पिझ्झाला जन्म दिल्याच्या नोंदी आहेत. व्यवसायानं बेकर असणार्या रॉफेलनं नेपल्सच्या भेटीला आलेल्या राजा अम्बर्टो प्रथम आणि राणी मार्गरिटा यांना खाऊ घातलेल्या पिझ्झ्यानं जगात इतिहास घडविला.
किंग अम्बर्टॊ आणि क्विन मार्गरिटा १८८९ साली नेपल्स भेटिला आले होते. त्यांच्यासाठी रोज फ्रेंच पध्दतीचे जेवण रांधण्यात येत असे. एकाच चवीचे पदार्थ खाऊन राजा राणी कंटाळले होते. त्यातून दोघेही अस्सल खवैय्ये. नेपल्सच्या अधिकार्यांना त्यांनी आदेश दिले की चवीला एकदम नविन असणारा एखादा खाद्यपदार्थ बनविला जावा. या पेचातून मार्ग काढण्यासाठी रॉफेलला पाचारण करण्यात आले.

रॉफ़ेलने राजा-राणींसाठी तीन प्रकारचे पिझ्झा बनविले. त्यातील एक पिझ्झा डुकराचे मांस, कॅसिओकॅवलो आणि तुळशीच्या पानांपासून बनवला गेला.तर, दुसर्यात व्हाईटेबल नावाचा मासा आणि तिसर्यावर टोमॅटो, मोजेरेला चीज घालण्यात आले होते.
महाराणी मार्गरिटाला हा तिसरा पिझ्झा खूप आवडला. तिच्या सन्मानार्थ म्हणून या पिझ्झाचं नाव मार्गरिटा पिझ्झा असं ठेवण्यात आलं जो आज जगभरात सर्वात आवडीनं खाल्ला जाणारा पिझ्झा मानला जातो.

त्यानंतरच्या काळात पिझ्झामध्ये फारसे बदल झाले नाहीत. आधुनिक काळामध्ये पिझ्झाचे रूप खूपच बदलले आहे. आताच्या काळामध्ये पिझ्झावर असणारे टोमॅटो, अननस, ‘स्टेक्स’, पिझ्झा सॉस आणि क्वचित मेयोनीज हे पदार्थ पारंपारिक पिझ्झामध्ये कधीच समाविष्ट केले गेले नव्हते. आताच्या बदलत्या काळामध्ये पिझ्झा जसा इटलीमधून निघून सर्वदूर जाऊन पोहोचला, तसतशा त्या त्या ठिकाणच्या खाद्य परंपरेच्या अनुसार त्यामध्ये बदल घडून आले.