World Tourism Day :भारत काय कमी हाय व्हय ! परदेशातील वास्तुंवर पैसे घालवाताय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Tourism Day

World Tourism Day :भारत काय कमी हाय व्हय ! परदेशातील वास्तुंवर पैसे घालवाताय

पुणे : काही लोकांना परदेश भ्रमन करायला आवडते. परदेशातील ऐतिहासिक वास्तू पहायला लोक गर्दी करतात. आवड असेल तर नक्कीच गेले पाहीजे परदेशात पण आपल्या भारतातही काही कमी वास्तू नाहीत. आपल्या देशाचा इतिहास इतका समृद्ध आहे की, सर्व ऐतिहासिक ठिकाणे भारताच्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. काही ऐतिहासिक ठिकाणे, प्राचीन मंदिरे, भव्य राजवाडे, मशिदी आणि किल्ले भारताच्या प्रत्येक राज्यात दिसतात.

विदेशी कल्चरही पाहिले, अभ्यासले पाहिजे. पण, परदेशात असणाऱ्या वास्तू भारतातही आहेत. अशावेळी त्याच ऐतिहासिक इमारती पहायला कशाला त्या इंग्रज लोकांन पैसे द्यायचे. त्यापेक्षा भारतातच फिरा आणि भारतीय पर्यटनाला प्रोत्साहन द्या. भारतात अशी अनेक इमारती आणि वास्तू आहेत ज्या विदेशी वास्तूंसारख्या दिसतात. त्यांना पाहिल्यावर ते खरोखरच आपल्या देशातील आहेत की परदेशी आहेत हे ओळखता येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया भारतातील या वास्तूंविषयी.

कुतुब मीनार (दिल्ली) आणि मीनार ए (पाकिस्‍तान) -

कुतुब मीनारबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आणि वाचत आलो आहोत. पण पाकिस्तानमध्ये एक अशी इमारत आहे जी हुबेहुब कुतुबमिनारसारखी दिसते. त्याला मिनार-ए-पाकिस्तान म्हणतात. हे तुम्हाला माहित नसेल. कुतुब मीनार आपल्याही देशात हवा म्हणून 1960 च्या दशकात मिनार-ए-पाकिस्तान बांधला गेला. दिल्लीतील कुतुबमिनार हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हे अद्भुत स्मारक दिल्ली सल्तनतचे पहिले राजे कुतुबुद्दीन ऐबक यांनी बांधले होते. याच्या बांधकामासाठी लाल संगमरवरी दगड वापरण्यात आले आहेत.

इंडिया गेट (दिल्ली) आणि आर्क डी ट्रायम्फ (फ्रांस) -

दिल्लीतील भारताचे प्रवेशद्वार असलेले इंडिया गेट खूप प्रसिद्ध आहे. १९२१ मध्ये पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ इंडिया गेट बांधण्यात आले होते. इंडिया गेटसारखी हुबेहुब रचना पॅरिसच्या आर्क डी ट्रायम्फची आहे. फ्रेंच क्रांतिकारक आणि नेपोलियन युद्धांमध्ये फ्रान्ससाठी लढलेल्या आणि मरण पावलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ ते 1806-36 दरम्यान आर्क डी ट्रायम्फे बांधले गेले होते. त्याच्या आतील आणि बाहेरील बाजूला फ्रेंच सैनिकांची नावे कोरलेली आहेत. इंडिया गेटच्या कमानीवर शहीद झालेल्या १३ हजारांहून अधिक ब्रिटिश आणि भारतीय सैनिकांची नावे कोरलेली आहेत. आर्क डी ट्रायॉम्फे तयार करण्यासाठी 30 वर्षे लागली.

जामा मस्जिद (दिल्ली) बादशाही मस्जिद (पाकिस्तान) -

दिल्लीतील जामा मशीद भारतातील सर्वात मोठी मशीद आहे. मुघल सम्राट शाहजहानने बांधलेल्या जामा मशीदीसारखीच मशीद पाकिस्तानमध्येही आहे. पाकिस्तानमध्ये बादशाही मशिद म्हणून ती ओळखली जाते. ही मशीद १६७३ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबने बांधली होती. ही मशीद मुघल काळातील सौंदर्य आणि भव्यता कशी असेल याचा अंदाज येतो. या मशिदीत एकाच वेळी ५५ हजार लोक नमाज अदा करू शकतात. १६५० मध्ये शाहजहानने जामा मशिदीचे बांधकाम सुरू केले होते.

लोटस टेंपल (दिल्ली) ओपेरा हाउस (सिडनी) -

दिल्लीच्या लोटस मंदिरासारखे सुंदर जगात काहीच नाही. हे मंदिर उमललेल्या कमळासारखे दिसते. हे मंदिर बहाई धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान असले तरी सर्व धर्माचे लोक तेथे येतात. हे लोटस टेंपल सिडनीमध्ये असलेल्या ऑपेरा हाऊससारखे आहे. ऑपेरा हाऊस हे एक आर्ट सेंटर असून ते 20 व्या शतकातील आहे.

कुंभलगड किल्ल्याची भिंत (राजस्थान) - ग्रेट वॉल ऑफ चायना (चीन)

जगातील 7 आश्चर्यांमध्ये असलेल्या ग्रेट वॉल ऑफ चायना सारखीच भक्कम भिंत भारतात कुंभलगड किल्ल्यावर आहे. किल्ल्याची संरक्षण मिळावे म्हणून ही भिंत बांधण्यात आली होती. या भिंतीची लांबी चीनच्या महान भिंतीपेक्षा कमी असली तरी त्याचे स्ट्रक्चर सेम आहे. केवळ 36 किलोमीटरची किल्ल्याची भिंतीची विशालता चीनच्या भिंतीसारखीच आहे.