अखेर मलेरियावर लस उपलब्ध!

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

-  घाना आणि केनियामध्येही लस होणार उपलब्ध 

नवी दिल्ली : मलेरिया या दुर्धर आजाराने आत्तापर्यंत अनेकजण ग्रस्त असतील. अशा लोकांना या आजारापासून दूर राहण्यासाठी कोणतीही प्रतिबंधक लस उपलब्ध नव्हती. परिणामी अनेक मलेरियाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, आता या आजारावर जगातील पहिली लस आणली आहे. आफ्रिकेत ही लस उपलब्ध करून देण्यात आली.

आफ्रिकेतील मलावी येथे ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. या लसीच्या निर्मितीसाठी गेल्या 30 वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. त्यानंतर अखेर ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मलेरिया या आजाराने बालकांसह अनेकांचा मृत्यू झाला. मलेरिया या आजारामुळे जगभरात दरवर्षी 4 लाख 35 हजार जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता ही प्रतिबंधक लसीचा फायदा अनेक मलेरियाग्रस्तांना होणार आहे. या मलेरिया प्रतिबंधक लसीला आरटीएस असे नाव देण्यात आले आहे. ही लस 2 वर्षांवरील मुलांना देता येणार आहे.

दरम्यान, घाना आणि केनिया या देशातही येत्या आठवड्यात ही लस उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) दिली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worlds first malaria vaccine launched in Africa