

Chinese President Xi Jinping arrives in Delhi for the BRICS Summit, with his special aircraft and high-security motorcade drawing attention
esakal
नवी दिल्ली : १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी (१२ सप्टेंबर) नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांचे विमान पालम हवाई तळावर उतरले. २०१९ नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर आलेल्या शी जिनपिंग यांच्या या भेटीकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.