
कर्नाटकातील अनंतपूर येथे २० भाविकांनी देहत्याग करण्याची घोषणा केली, ज्यात पुण्यातील १० भाविकांचा समावेश आहे.
हे सर्व भक्त रामपाल महाराजांचे अनुयायी असून महापूजेच्या समारोपाला प्राण अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रशासनाने समुपदेशन, डॉक्टरांची टीम, कलम १४४ लागू करून भाविकांना रोखण्याची कारवाई सुरू केली आहे.
Karnataka Pune Connection: कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील अनंतपूरमध्ये एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. देहत्याग करणार असल्याचे २० भाविकांनी जाहीर केले आहे विशेष म्हणजे या सध्या पुण्यात वास्तव्य करणाऱ्या मूळच्या उत्तरप्रदेशातील १० भाविकांचा समावेश आहे. देहत्याग करण्याच्या भक्तांच्या घोषणेनंतर प्रशासन देखील हादरून गेले. दरम्यान अधिकारी तिथे पोहोचले असून डॉक्टरांसह अधिकाऱ्यांची एक टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमधून आलेल्या भाविकांना परत पाठवलेअसून भाविकांचे मनपरिवर्तन करणे सुरु आहे.