UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर दाट धुक्यामुळे ५ बस आणि कारचा भीषण अपघात होऊन ४ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची मोठी घोषणा केली.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मंगळवारी पहाटे यमुना एक्सप्रेसवेवर १२७ व्या माइलस्टोनजवळ एक भीषण आणि हृदयद्रावक अपघात झाला. दाट धुक्यामुळे ५ बस आणि ४ कार एकमेकांवर आदळल्या. धडक झाल्यानंतर या सर्व वाहनांनी पेट घेतला.