Karnataka Politics
esakal
चिक्कोडी : आगामी २०२८ ची विधानसभा निवडणूक माझे वडील आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) लढवणार नाहीत. मात्र, काँग्रेसच्या सिध्दांतावर चालणारे राज्यात अनेक राजकारणी आहेत. त्यांनी सतीश जारकीहोळी यांना पुढे नेले पाहिजे. सिद्धरामय्यांनंतर त्यांच्या जागेवर काम करण्याची ताकद सतीश जारकीहोळींमध्ये आहे आणि सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) हेच सिद्धरामय्या यांचे वारसदार आहेत, असे परखड मत विधान परिषद सदस्य डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी केले.