
'तुम्ही सगळे मरणार'; वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील कारवाईवर नरसिंहानंद संतापले
हरिद्वार धर्म संसदेत मुस्लिम धर्मियांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी पहिली अटक केली आहे. या अटकेमुळे संतप्त झालेल्या यति नरसिंहानंद (Yati Narsinghanand) यांनी पोलिस अधिकाऱ्यांना, 'तुम्ही सर्व मरणार आहात' असा शापच दिला आहे. द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी आरोपी धर्मगुरूंमध्ये यति नरसिंहानंद यांचाही समावेश आहे. हरिद्वार येथे आयोजित धर्म संसदेत कथित वादग्रस्त वक्तव्य (Heat Speech Case) केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी याला अटक केली. या प्रकरणातील ही पहिली अटक आहे.
हेही वाचा: नन बलात्कार प्रकरणातून बिशपची निर्दोष मुक्तता
उत्तराखंड पोलिसांनी यति नरसिंहानंद आणि आणखी एक आरोपी साध्वी अन्नपूर्णा यांना नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी त्यागीला ताब्यात घेताना नरसिंहानंद यांना सहकार्य करण्याची विनंती करताना दिसत आहेत. कारमध्ये बसलेले यती नरसिंहानंद त्यागीला अटक का करत आहे, असे विचारताना दिसत आहेत. यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात त्यांना अटक करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: कोरोनावर प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मान्यता
नरसिंहानंद म्हणाले, "सर्व गोष्टींमध्ये मी त्यांच्यासोबत आहे. त्यांनी हे काम एकट्याने केलं का? आमच्या पाठिंब्याने तो हिंदू झाला आहे." मात्र आता तरीही ते पोलिसांनी कारवाई थांबवली नाही. त्यानंतर नरसिंहानंद म्हणाले की, "तुम्ही सर्व मराल अन् तुमची मुलंही..."
Web Title: Yati Narsinghanand Angry On Police Haridwar Dharma Sansad Heat Speech Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..