esakal | Year End 2020: गुन्हेगारी जगतातील 5 घटना ज्यांनी देशाला हादरवून सोडलं
sakal

बोलून बातमी शोधा

crime

वर्ष 2020 संपण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत

Year End 2020: गुन्हेगारी जगतातील 5 घटना ज्यांनी देशाला हादरवून सोडलं

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- (Look back 2020) वर्ष 2020 संपण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. हे वर्ष अनेकदृष्टीने कठिण गेले. कोरोना महामारीने अनेकांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकला. 2020 वर्ष सर्वांनाच लक्षात राहिल. शिवाय 2020 मध्ये गुन्हेगारी जगतात अशा काही घटना घडल्या ज्यांनी देशाला हादरवून सोडलं.

1. विकास दुबेचे एनकाऊंटर

2 जूलै 2020 रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झालेल्या एका घटनेने पोलिसांची झोप उडाली. चौबेपूर क्षेत्रात बिकरु गावात 8 पोलिस कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गँगस्टर दुबेला अटक करण्याचा प्रयत्न केला. पण, तो फरार झाला. अनेक दिवस लपाछपीचा डाव खेळल्यानंतर तो अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. मध्ये प्रदेशच्या उज्जैनमधून त्याला अटक करण्यात आली. यूपी पोलिस विकास दुबेला कानपूर येथे घेऊन येत होते. यावेळी दुबे ज्या गाडीत होता त्याच गाडीचा नेमका अपघात झाला. दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पोलिसांनी त्याचा एनकाऊंटर केला. याप्रकरणी पोलिसांच्या एनकाऊंटरवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 

केरळ सरकारची मोफत लशीची घोषणा भाजपला पचेना; निवडणूक आयोगाकडे तक्रार

2. हाथरस गँगरेप

हाथरस गँगरेप प्रकरण संपूर्ण देशभर गाजलं. 14 डिसेंबर 2020 ला हाथरसमध्ये एका 20 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला. नराधमांनी मुलीची जीभ कापली आणि तिला शारीरिक वेदना दिल्या. पीडितेचा 29 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या सफदरगंज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. घाई-गडबडीत यूपी पोलिसांनी रात्री अडिचच्या सुमारास कुटुंबीयांना खोलीमध्ये बंद करत पीडितेचा अंतिम संस्कार उरकला. पोलिसांचे हे कृत्ये अनेक प्रश्न उपस्थित करणारे होते. काँग्रेस, आप, टीएमसी पक्षांनी हाथरसमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. सध्या हे प्रकरण सीबीआयकडे आहे. 

3. पालघर मॉब लिंचिंग

महाराष्ट्राच्या पालघरमध्ये दोन साधूंना आणि त्यांच्या ड्रायव्हरला मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. साधूंच्या हत्येने देशभरात संताप पसरला. मुले पळवून नेणारी टोळी म्हणून त्यांना गावकऱ्यांनी निर्दयीपणे काठ्यांनी मारले होते. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी राज्य सीआयडीने 134 पेक्षा अधिक लोकांना अटक केली आहे. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा मोठा प्रयत्न झाला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समोर येऊन यावर बोलावं लागलं. 

4. निकीता हत्याकांड

हरियाणाच्या वल्लभगडमध्ये 26 ऑक्टोंबर 2020 मध्ये एका विद्यार्थीनीची दिवसाढवळ्या गोळी मारुन हत्या करण्यात आली. विद्यार्थीनी परीक्षा देऊन घरी परतत होती. तेवढ्यात आरोपी तौसीफने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. तिने गाडीत बसण्यास नकार दिल्याने, तौसीफने निकीताच्या डोक्यात गोळी घातली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पोलिसांनी तौसीफसह अन्य एकाला याप्रकरणी अटक केली. तौसीफ निकीताला लग्नासाठी दबाव आणता होता, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला. त्यानंतर हिंदू संघटनांनी या घटनेला 'लव्ह जिहाद'चा रंग दिला. योगी सरकारने 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा आणला आहे, हरियाणाही असाच कायदा आणण्याच्या तयारीत आहे. 

मोठी बातमी! अमेरिकेत लसीकरण सुरु; ट्रम्प यांनी जगाचं केलं अभिनंदन

5.शिवहर गोळीकांड

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवहर मतदारसंघातून जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांच्या हत्येने खळबळ उडाली. 24 ऑक्टोंबर 2020 ला प्रचारादरम्यान सिंह यांच्यावर हल्ला झाला. दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी गोळी मारली. जमावाने दुचाकीस्वारांना पकडले. दोघांना जबर मारहाण करण्यात आली, ज्यात एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण सिंह यांच्याविरोधात दोन डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल होते. याप्रकरणी तपास सुरु आहे. 


 

loading image
go to top