
Year Ender २०२१ : कोरोनाच नव्हे तर या घटना राहतील कायम स्मरणात
नवीन वर्ष येते आणि जाते. आपल्यासोबत चांगल्या आणि वाईट आठवणी घेऊन जाते. २०२१ मध्ये (Year Ender २०२१) सुद्धा असचं घडलं. कोरोनाने चांगलाच कहर केला. २०२२ मध्ये तरी कोरोनाने (coronavirus) मोठे नुकसान होऊ नये अशी आशा आहे. मात्र, यावर्षीच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत आणि कदाचित नेहमीच ताज्या राहतील.
२०२१ हे वर्ष कोरोना (coronavirus) विषाणूच्या भीतीतच सुरू झाले. ऑक्सिजनची कमतरता, रुग्णालयात खाटांची कमतरता, संसर्ग टाळण्यासाठी निर्बंधामुळे लोकांची मोठी अडचण झाली. अनेकांना जीवही गमवावा लागला. कोरोना व्यतिरिक्त देशात अशा अनेक मोठ्या घटना घडल्या ज्या इतिहासात कायमस्वरूपी नोंदल्या गेल्या आहेत. लोक या घटना नेहमी लक्षात ठेवतील. चला तर जाणून घेऊया २०२१ मधील सर्वांत मोठ्या पाच घटनांबद्दल.

शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा
कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी २०२० पासून धरणे देत होते. मात्र, यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा (farmers agitation) काढल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. दिल्ली सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी लाल किल्ल्याकडे निघाले तेव्हा प्रचंड लाठीचार्ज झाला. पोलिस आणि शेतकरी यांच्यातील वाद वाढत गेला. शेतकरी संतापले. काही अतिरेकी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून निशान साहिबचा झेंडा फडकवायला सुरुवात केली. या ट्रॅक्टर मार्चाचे हिंसाचारात रूपांतर झाले. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण
जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी सात पदके जिंकली होती. ज्यामध्ये निरज चोप्राने (neeraj chopra) भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर हॉकीमध्ये पदक जिंकले. भारतासाठी हा उत्सवापेक्षा कमी नव्हता.

शंभर कोटी लसीचे लक्ष्य पूर्ण
कोरोना संसर्गाच्या धोक्यात ऑक्टोबरमध्ये भारताने शंभर कोटी लसीचे डोस पूर्ण करून इतिहास रचला तेव्हा देशाला दिलासा मिळाला. लसीकरण मोहिमेत भारताच्या नावावर एक मोठी उपलब्धी जोडली गेली आहे. शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अवघ्या नत्र महिन्यांत देशाने ही कामगिरी केली.

पेंडोरा पेपर लीक
ऑक्टोबरमध्येच पेंडोरा पेपर्स लीक झाल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या घोटाळ्यात ९० देशांतील शेकडो राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्तींची नावे उघड झाली. ज्यांनी आपली संपत्ती लपवण्यासाठी गुप्त कंपन्यांचा वापर केला. भारतासाठी हा खुलासा मोठा होता. कारण, पेंडोरा पेपर लीकमध्ये क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरचे नावही आले होते. या यादीत तीनशे भारतीयांची नावे आली आहेत.

CDS Bipin Rawat Death
बिपिन रावत यांचे निधन
वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या सुरुवाती हवाई दलाचे Mi 17 हेलिकॉप्टर कोसळले. ही घटना घडली तेव्हा लष्कराचे सर्वोच्च अधिकारी सीडीएस जनरल बिपिन रावत (bipin rawat pass away) हे पत्नीसह हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित होते. हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ लोक होते. ज्यामध्ये लष्कराचे अनेक वरिष्ठ अधिकारी होते. या अपघातात देशाने सर्वांना गमावले.

harnaz kaur
२१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब
सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर भारताच्या आणखी एका मुलीला मिस युनिव्हर्स २०२१ चा किताब मिळाला आहे. चंदीगडच्या हरनाज कौर संधूने (harnaj kaur) २१ वर्षांनंतर देशाला हा आनंद दिला. ही पदवी मिळवणारी ती भारतातील तिसरी महिला आहे