

esakal
नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टचे उद्घाटन झाल्यापासून जेवर परिसरात जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच स्वतःचे हक्काचे घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी यमुना एक्सप्रेसवे प्राधिकरणाने (YEIDA) एक आनंदाची बातमी आणली आहे. प्राधिकरणाने ९७३ निवासी प्लॉटसाठी आपली नवीन योजना अधिकृतपणे लाँच केली आहे. जेवर एअरपोर्ट, फिल्म सिटी आणि यमुना एक्सप्रेसवेच्या अगदी जवळ राहण्याची ही एक मोठी संधी आहे.