Video: पिवळ्या साडीमधील अधिकाऱयाचा व्हिडिओ वायरल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

रिना द्विवेदी यांनी 'तेरी आख्या का काजल...' या गाण्यावर डान्स केला असून, त्याचा टिक टॉक व्हिडिओ बनवला आहे.

लखनौ: लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रावर पिवळ्या साडीमधील निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी यांचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सध्या त्यांचा टिक टॉकवरील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

रिना द्विवेदी यांनी 'तेरी आख्या का काजल...' या गाण्यावर डान्स केला असून, त्याचा टिक टॉक व्हिडिओ बनवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, लाखो नेटिझन्सनी तो व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये रिना हिरव्या साडीमध्ये डान्सर सपना चौधरीप्रमाणे डान्स स्टेप करताना दिसत आहे. रिना यांनी सपनापेक्षाही चांगला डान्स केला आहे, अशा प्रतिक्रिया नेटझन्सनी नोंदवल्या आहेत.

रिना द्विवेदी कोण आहेत?
लोकसभा निवडणूकीत पिवळ्या साडीमधील छायाचित्र व्हायरल झालेल्या फोटोमुळे रिना द्विवेदी चर्चेत आल्या होत्या. त्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी असून, सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील आल्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या जबाबदारीमुळे त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या. पण, बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास स्वीकारणार असल्याचे रिना यांनी सांगितले. लहानपणापासून त्यांना फिटनेस आवड आहे. लखनौमध्ये राहत असलेल्या रिना द्विवेदी यांनी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yellow saree fame UP poll official Reena Dwivedi dances to sapana choudharys song video viral