हिंदूंनी 'हर घर तिरंग्या'वर बहिष्कार टाकावा: यती नरसिंहानंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yati Narsinhanand

हिंदूंनी 'हर घर तिरंग्या'वर बहिष्कार टाकावा: यती नरसिंहानंद

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दसना देवी मंदिरातील पीठाधीश्‍वर आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आणि हिंदूंना भाजपच्या मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) इराज राजा यांनी सांगितले की, पोलिस यतीच्या व्हायरल व्हिडिओचा तपास करत आहेत. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्याच्या कलमांखाली कारवाई केली जाईल.

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये यती हे सांगत आहे की, सरकारने पश्चिम बंगालमधील सलाउद्दीन नावाच्या मुस्लिमाच्या मालकीच्या कंपनीला तिरंगा बनवण्याचे कंत्राट दिले आहे. हिंदू हे जगातील सर्वात मोठे ढोंगी असल्याचे ते व्हिडिओमध्ये म्हणत आहे. भाजपवर निशाणा साधत त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, हे लोक सत्तेत आल्यावर त्यांनी मुस्लिमांना सरकारी निविदा दिल्या. तिरंगा खरेदी करण्यासाठी हिंदूंना जो पैसा द्यावा लागेल तो मुस्लिमांच्या खिशात जाईल आणि जिहादींना (इस्लामी अतिरेकी) दान केला जाईल.

हेही वाचा: Har Ghar Tiranga : ‘तिरंगा’ लावायचा कुठे, असा प्रश्न शेकडो बेघरांना पडला

पुढे ते म्हणाले की, हिंदू समाजाला आपल्या भावी पिढ्यांना मुस्लीम अतिरेक्यांपासून वाचवायचे असेल तर मुस्लिम ठेकेदाराला आर्थिक लाभ मिळू नये यासाठी भाजपच्या तिरंगा मोहिमेवर बहिष्कार टाकावा, असे यति म्हणाले. ते म्हणाले की हिंदू त्यांच्या छतावर कोणताही जुना ध्वज फडकावू शकतात. हा व्हिडिओ या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज झाला होता पण तो गेल्या दोन दिवसांत समोर आला होता. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ उत्तर प्रदेश सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा अभियान' पुकारले आहे.

हेही वाचा: Har Ghar Tiranga: काय करावे, काय टाळावे?

Web Title: Yeti Narasimhanand Har Ghar Tirangya Hindus Should Boycott

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..