VIDEO: 'मी OBC म्हणालोच नाही'; #BoycottPatanjali ट्रेंडनंतर बाबा रामदेव यांचा घुमजाव

योगगुरु बाबा रामदेव हे वादात अडकत असताना दिसत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना कथीतरित्या ओबीसींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावरुन बाबा रामदेव माफी मांगो हा हॅशटॅग एक्सवर ट्रेंड होताना दिसत आहेत.
BoycottPatanjali
BoycottPatanjali

नवी दिल्ली- योगगुरु बाबा रामदेव हे वादात अडकत असताना दिसत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना कथीतरित्या ओबीसींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावरुन बाबा रामदेव माफी मांगो हा हॅशटॅग एक्सवर ट्रेंड होताना दिसत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी पतंजली उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. (yog guru baba ramdev patanjali statement on obc caste controversy)

सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आस्था चॅनेलवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यात ते म्हणतात की, 'ओबीसींची ऐसी तेसी, मी ब्राह्मण आहे आणि चारही वेदांचा अभ्यास केला आहे. मी अग्निहोत्री ब्राह्मण आहे आणि माझं गौत्र ब्रह्म गौत्र आहे'. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहे.

रामदेव बाबांचे स्पष्टीकरण

बाबा रामदेव यांना याबद्दल विचारण्यात आल्यानंतर त्यांनी ओबीसी असा उल्लेख केला नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, 'मी ओबीसींबाबत काहीही म्हटलं नाही. मी ओवैसी म्हणालो. ओवैसी उलट्या डोक्याचे आहेत. त्यांच्या पूर्वजांनी देशद्रोही विचारधारा बाळगली होती.' सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लोकांनी बाबा रामदेव यांच्या विरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

बाबा रामदेव यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. एक्सवर 'पोस्ट'चा वर्षाव होत आहे. बाबा रामदेव माफी मांगो हे ट्रेंडमध्ये आलं आहे. तसेच #Boycott_Patanjali असं लिहित पतंजली उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली आहे. बाबा रामदेव यांच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद शमतो का हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com