esakal | 'हिंदूंचा अपमान करणाऱ्यांवर बहिष्कार टाका'; रामदेवबाबांचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

'हिंदूंचा अपमान करणाऱ्यांवर बहिष्कार टाका'

'हिंदूंचा अपमान करणाऱ्यांवर बहिष्कार टाका'

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोना संकटात कॉंग्रेस टूलकिटद्वारे जनमानसात गैरसमज पसरवण्याचे काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा कॅाग्रेसचा डाव आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केला काल केला होता. संबित पात्रा यांनी काल पत्रकार परिषदेत कॅाग्रेसच्या टुलकिटबाबत माहिती दिली. यावरुन भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आता या सगळ्या वादामध्ये योगगुरु रामदेव बाबा यांनीही उडी घेतली आहे. रामदेव बाबा यांनी यासंदर्भात बोलताना हे हिंदूंच्या बदनामीचं षड्यंत्र असल्याचं मोठं विधान केलं आहे. रामदेव बाबा यांनी काँग्रेसचे नाव न घेता टीका केली आहे.

हेही वाचा: भाजपा खासदाराने स्वत: साफ केलं कोविड सेंटरमधील शौचालय

रामदेव बाबा यांनी म्हटलंय की, टूलकिटद्वारे कुंभमेळा आणि हिंदूत्वाची बदनामी करणे हा एक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कट आणि गुन्हा आहे. हा गुन्हा करणाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी जरुर राजकारण करावं मात्र हिंदूंचा अपमान करु नये. हा देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही. अशा शक्तींना वाळीत टाकण्याचे तसेच विरोध करण्याचे आवाहन मी हिंदूंना करतो.

काय आहे टूलकिटबाबतचा नवा वाद?

काल सांबित पात्रा यांनी आरोप करताना म्हटलंय की, कोरोना महामारीमध्ये काँग्रेस पक्ष देशाला आणि नरेंद्र मोदींना बदनाम करीत आहेत. कॅाग्रेसचे नेते भारतीय विषाणूला 'मोदी विषाणू' म्हणतात, कुंभमेळ्याला 'सुपर स्प्रेडर' म्हणून सांगतात, अन्य विचारवंतानाही काँग्रेस अशाच प्रकारचे विधानं करण्यासाठी सांगत आहेत. राहुल गांधी रोज सकाळी जे ट्विट करतात तो देखील याच टूलकिटचा एक भाग आहे. राहुल गांधी ट्विट करुन देशाला बदनाम करीत आहेत. त्यांनी कुंभमेळ्याच्या वेळी ट्विट केलं होतं, पण ईदच्या वेळी मैान धारण केलं, असंही पात्रा म्हणाले होते.

loading image