
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे त्यांच्या कठोर प्रशासनासाठी आणि हिंदुत्ववादी प्रतिमेसाठी देशभरात ओळखले जातात. मात्र, त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर राहून देशाची सेवा करत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे धाकटे बंधू शैलेंद्र मोहन (Shailendra Mohan) हे भारतीय सैन्यात (Indian Army) कार्यरत असून, ते 'गडवाल रायफल्स' (Garhwal Rifles) या प्रतिष्ठित रेजिमेंटमध्ये सुभेदार (Subedar) या पदावर आहेत. त्यांच्या साधेपणा आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचे सध्या कौतुक होत आहे.