यांच्या नसानसांत 'तमंचावाद'; योगींची अखिलेश यांच्यावर बोचरी टीका

अखिलेश यादव यांना तमंचवादी म्हणत योगींनी त्यांनी दंगलखोर आणि हिंसक म्हटंले आहे.
UP Election News Updates
UP Election News Updatesesakal
Updated on

नवी दिल्ली : देशातील सध्या पाच राज्यात विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत आहे. यात उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरणात रोज नव्या घडामोडी घडत आहेत. सपाचे नेते अखिलेश यादव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात अनेक कारणांवरून टोलेबाजी पहायला मिळत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांना समाजवादीला (Samajvadi party) 'तमंचवादी' म्हटंले आहे. अखिलेश यादव हे समाजवादी असून त्यांच्या शिक्षणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अखिलेश यादव यांना तमंचवादी म्हणत योगींनी त्यांनी दंगलखोर आणि हिंसक म्हटंले आहे. (UP Election News Updates)

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर ट्वीट करत निशाणा साधला आहे. यात ते म्हणतात, 'ज्यांना पाकिस्तान (Pakistan) शत्रू वाटत नाही, तर जिना हे मित्र वाटतात. त्यांच्या शिक्षण-दीक्षा आणि दूरदृष्टीबद्दल काय बोलावे. ते स्वत:ला समाजवादी म्हणवतात, पण खरे हेच आहे की त्यांच्या शिरपेचात 'तमंचवाद'च भरला आहे.

UP Election News Updates
जो बायडेन यांची पत्रकाराला शिवीगाळ; महागाईवर प्रश्न विचारताच संतापले

दुसर्‍या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांवरही हल्लाबोल केला आहे. यासाठी त्यांनी एक म्हणही वापरली आहे. "करें न धरें, तरकस पहने फिरें...", याचा अर्थ सत्तेत असतानाही काहीच केलं नाही आणि आता पाठिला भाता अडकवून तीर मारत सुटलेत अशी टीकाही त्यांनी केली आहे.

UP Election News Updates
शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी गडगडला; सेन्सेक्स घसरणीनंतर सावरला

दरम्यान, १० फेब्रुवारीपासून राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरु होत आहेत. सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांपूर्वीच सर्वच राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीचे वर्णन निरर्थक आणि निरुपयोगी असे केले आहे. तर योगी आदित्यनाथ यांनी यादव यांच्या राजवटीचे वर्णन लूट, दंगली आणि मुस्लिम तुष्टीकरणाचा समर्थक म्हणून केले आहे. त्यामुळे आता अखिलेश यादव यावर कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com