esakal | योगी सरकारच्या शेवटच्या बजेटमध्ये मोठ्या घोषणा; शेतीसाठी मोफत पाणी, अयोध्येसाठी भरीव तरतूद
sakal

बोलून बातमी शोधा

yogi budget

योगी आदित्यनाथ सरकारने सोमवारी उत्तर प्रदेश विधानसभेचा पहिला पेपरलेस बजेट सादर केला.

योगी सरकारच्या शेवटच्या बजेटमध्ये मोठ्या घोषणा; शेतीसाठी मोफत पाणी, अयोध्येसाठी भरीव तरतूद

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लखनऊ- योगी आदित्यनाथ सरकारने सोमवारी उत्तर प्रदेश विधानसभेचा पहिला पेपरलेस बजेट सादर केला.  आर्थिक वर्ष 2021-22 साठी राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी बजेट सादर केला. विधानसभेत बजेट वाचताना खन्ना म्हणाले की, सरकारचे लक्ष्य उत्तर प्रदेशला आत्मनिर्भर आणि राज्याचा विकास करण्याचे आहे. निवडणुकीपूर्वीचा योगी सरकारचा हा पाचवा आणि शेवटचा बजेट आहे. अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीकरणासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

शेतकऱ्यांसाठी घोषणा

शेतकरी आंदोलन सुरु असताना योगी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कमी दरांमध्ये कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील अधिक उत्पन्न देणाऱ्या जमिनीला चिन्हीत केले जाईल आणि ब्लॉक स्तरावर कृषी उत्पादन संघटनांची स्थापना करण्यात येईल. यासाठी बजेटमध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

DMK हिंदू विरोधी पक्ष, तमिळला वाचवायचं असेल तर हिंदुत्त्वाची गरज- भाजप नेते...

तरुणांसाठी बजेटमध्ये काय?

योगी सरकारने घोषणा केलीये की, स्पर्था परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्यात येईल. बेरोजगार विद्यार्थ्यांची काऊंसलिंग केली जात आहे. आतापर्यंत 52 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. 

अयोध्येसाठी 140 कोटी रुपयांची तरतूद

अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी अयोध्येचा विकास करण्यासाठी 140 कोटी रुपयांची भरिव तरतूद केली आहे. अयोध्येत प्रभू रामाच्या नावाने विमानतळ विकसित केले जाणार आहे. लखनऊमध्ये राष्ट्रीय प्रेरणा स्थळाच्या निर्माणासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

भीमा कोरेगाव केस : वर्वरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीनाचा दिलासा

अर्थमंत्र्यांनी 55,0270 कोटी रुपयांच्या बजेटचा प्रस्ताव सादर केला. यावर्षीच्या बजेटचा आकार मागील वर्षीच्या तुलनेत 37,410 कोटी रुपयांनी अधिक आहे. खन्ना यांनी हाशमी यांच्या गझलमधील शेर ''यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट भी लेकर चिराग जलता है''सोबत आपल्या बजेटच्या भाषणाची सुरुवात केली.