esakal | DMK हिंदू विरोधी पक्ष, तमिळला वाचवायचं असेल तर हिंदुत्त्वाची गरज- भाजप नेते तेजस्वी सूर्या
sakal

बोलून बातमी शोधा

Tejasvi Surya.jpg

भाजप तमिळनाडू आणि तमिळ भाषेचा आत्मा असून त्यांचे प्रतिनिधित्व ही करतो. द्रमुक हा एका कुटुंबाचा पक्ष आहे. तर भाजपसाठी पक्षच परिवार आहे.

DMK हिंदू विरोधी पक्ष, तमिळला वाचवायचं असेल तर हिंदुत्त्वाची गरज- भाजप नेते तेजस्वी सूर्या

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

सेलम- भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी तमिळनाडूतील प्रमुख पक्ष द्रमुकवर हल्लाबोल केला आहे. द्रमुक हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एम के स्टॅलिन यांच्या पक्षाला पराभूत करावे लागेल. कारण भाजप एकमेव असा पक्ष आहे, जो भारतातील सर्व भाषांचा सन्मान करतो आणि प्रोत्साहन देतो, असे वक्तव्य त्यांनी एका सभेत केले. भाजयुमोने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, द्रमुक एक अत्यंत वाईट आणि धोकादायक विचारधारेचे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष आहे. ते हिंदू विरोधी आहेत. प्रत्येक तमिळ एक अभिमानी हिंदू आहे. ही अशी एक पवित्र जागा आहे, जिथे देशात सर्वाधिक हिंदू मंदिरं आहेत. तमिळनाडूतील एक-एक इंच पवित्र आहे. परंतु, द्रमुक हिंदू विरोधी आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा पराभव करावाच लागेल. भाजपच तमिळनाडूचा आत्मा आणि तमिळ भाषेचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले. 

हेही वाचा- पुद्दुचेरीत काँग्रेसने बहुमत गमावले, CM नारायणसामी यांचा राजीनामा

जर तमिळला वाचवायचं असेल तर हिंदुत्त्वाचा विजय होणे आवश्यक आहे. जर कन्नडला वाचवायचं असेल तर हिंदुत्त्व विजयी होणे गरजेचे आहे. भाजप तमिळनाडू आणि तमिळ भाषेचा आत्मा असून त्यांचे प्रतिनिधित्व ही करतो. द्रमुक हा एका कुटुंबाचा पक्ष आहे. तर भाजपसाठी पक्षच परिवार आहे. द्रमुकच्या हिंदू विरोधी विचारधारेला आव्हान द्यावेच लागेल. जेव्हा ते सत्तेत असतात तेव्हा ते हिंदू संस्था आणि आस्थेवर हल्ला करतात. सत्तेबाहेर जेव्हा जातात तेव्हा हिंदूंकडे मते मागतात. असं चालणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, या वर्षअखेर तमिळनाडूत विधानसभा निवडणूक होणार आहे. 

हेही वाचा- 'मोदीजी AC कारमधून बाहेर निघा'; महाग पेट्रोल-डिझेलविरोधात रॉबर्ट वाड्रांची सायकल राईड