'छा_गयी_योगी_सरकार' ट्विटरवर का होतंय ट्रेंड?

एकीकडे नागरिक गणपती विसर्जनात व्यग्र असताना ट्विटरवर योगी आदित्यनाथ सरकार का चर्चेत आहे?
yogi adityanath
yogi adityanath
Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या नावाने आज ट्विटरवर 'ट्रेंड' सुरू आहे. नेटकरी मोठ्या प्रमाणात 'छा_गयी_योगी_सरकार' या हॅशटॅगचा वापर करत आहेत. एकीकडे देशभरात गणपती विसर्जनाचा उत्साह असताना योगी आदित्यनाथ नक्की का ट्रेंड होत आहेत, जाणून घेऊया...

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज साडेचार वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप समर्थकांनी ट्विटरवर 'छा_गयी_योगी_सरकार' हॅशटॅग वापरून मोठ्या प्रमाणात पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी योगी सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला आहे. योगी सरकारने मागील साडेचार वर्षे गव्हर्नंस दिल्याचा दावा देखील होत आहे. काही समर्थकांनी माहिलांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था देखील सुधारल्याच्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

2022 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. योगी आदित्यनाथ सरकावर विरोधकांनी टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. अशा वेळी सोशल मीडियावर भाजपच्या आयटी सेलकडून ट्रेंड चालवण्यात येत असल्याच्या काही कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे ट्विटर वॉरला सुरुवात झाल्याचं चित्र आहे.

yogi adityanath
अंबिका सोनींनी नाकारली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची!

सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला देशभरात 'बेरोजगार दिवस' ट्रेंड होत होता. त्यानंतर योगींनी उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात राज्यातील बेरोजगारी 17 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आणल्याची माहिती दिली. आज ट्रेंड होत असलेल्या हॅशटॅगमध्ये देखील समर्थकांनी बेरोजगारी कमी झाल्याच्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

या विविध पोस्टमध्ये 341 किमी लांबीचा पूर्वांचल एक्सप्रेस,गोरखपूर आणि रायबरेलीतील एम्सची पायाभारणी, पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य, मथुरातील पेप्सिको प्लांट, उजाला योजनेअंतर्गत 2.6 कोटी एलईडी बल्बचे वाटप, कानपूर मेट्रो ट्रेनसेट, 45 कृषी उत्पादने शुल्कांपासून मुक्त, 220 नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, बेरोजगारी दर 17 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

yogi adityanath
पंजाबनंतर राजस्थान काँग्रेसला धक्का; मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचा राजीनामा

मात्र, विरोधकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनेकांनी भाजपच्या सोशल मीडिया टीमची ही करामत असल्याच्या कमेंट्स या पोस्टमध्ये केल्या आहेत. तसेच उत्तर प्रदेशात तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याचं काही जणांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com