esakal | Coronavirus : शाळा, महाविद्यालयांना 22 मार्चपर्यंत सुट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : शाळा, महाविद्यालयांना 22 मार्चपर्यंत सुट्टी

11 रुग्णांची तपासणी पॉझिटिव्ह

Coronavirus : शाळा, महाविद्यालयांना 22 मार्चपर्यंत सुट्टी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. या व्हायरसने भारतातही चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना येत्या 22 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून विविध उपाय केले जात आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा-महाविद्यालय 22 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ही महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

छत्तीसगड सरकारने घेतला निर्णय

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पावले उचलली जात आहेत. त्यानंतर आता छत्तीसगड सरकारनेही राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

साथीचे रोग घोषित नाही

कोरोना व्हायरसची दहशत उत्तर प्रदेशातील अनेक शहराला आहे. राजधानी लखनौमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत साथीचे रोग म्हणून घोषणा करण्यात आली नाही. 

loading image