'या' मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवली आहेत गृह खात्यासह तब्बल 37 खाती

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळात नव्याने समावेश केलेल्या मंत्र्यांना शुक्रवारी खातेवाटप केले. यात गृह आणि महसूलसह तब्बल 37 खाती योगींनी स्वतःकडेच ठेवली आहेत. 

लखनौ ः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळात नव्याने समावेश केलेल्या मंत्र्यांना शुक्रवारी खातेवाटप केले. यात गृह आणि महसूलसह तब्बल 37 खाती योगींनी स्वतःकडेच ठेवली आहेत. 

उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न प्रक्रिया, मनोरंजन कर व सार्वजनिक उपक्रम विभागाची जबाबदारी सोपविली आहे. दुसरे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना माध्यमिक व उच्च शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व आय. टी. विभागाचा कार्यभार सोपविला आहे. 

आदित्यनाथ यांनी गृह, महसूल, गृहनिर्माण, खनिकर्म, सचिवालय प्रशासन, नियुक्ती, माहिती व संस्थात्मक अर्थपुरवठा आदी खाती स्वतःकडे ठेवली आहेत. सुरेशकुमार खन्ना यांच्याकडे महत्त्वपूर्ण अर्थखात्यासह विधिमंडळ कामकाज व वैद्यकीय शिक्षण विभाग दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogi Adityanath Keeps 37 Departments