

CM Yogi Adityanath
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी सकाळी प्रयागराजमध्ये गंगा पूजन करून माघ मेळ्याच्या तयारीची औपचारिक सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी रामबाग येथील आमदार हर्षवर्धन वाजपेयी यांच्या निवासस्थानी हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर, संगम क्षेत्राजवळील व्हीआयपी घाटावर पोहोचले.