

Transparent Recruitment in UP: Yogi Adityanath Slams Previous Regimes
Sakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भाष्य करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. "आधीच्या काळात भरती म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा होता, पण आता केवळ गुणवत्तेच्या जोरावर तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळत आहेत," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
लखनौमधील लोकभवन येथे उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाद्वारे (UPSSSC) नवनियुक्त लेखा परीक्षकांना (Auditors) नियुक्ती पत्रे प्रदान करताना मुख्यमंत्री बोलत होते.