मोदीराजमुळे सर्वांचा विकास, योगी आदित्यनाथ यांनी केला दावा

गेल्या साडेचार वर्षांमध्ये युपीत एकही दंगल झालेली नाही. दंगल करणाऱ्यांना माहित आहे की दंगल केल्यास त्यांच्या सात पिढ्यांना दंड भरावे लागेल.
File photo of Yogi Adityanath
File photo of Yogi Adityanath
Updated on

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी एका कार्यक्रमात विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला केला. समाजवादी पक्षाला उद्देशून योगी म्हणाले, की पूर्वी केवळ एकाच परिवाराचा विकास होत होता. मात्र मोदीराजमध्ये सबका साथ आणि सर्वांचा विकास होत आहे. गेल्या साडेचार वर्षांमध्ये युपीत एकही दंगल झालेली नाही. दंगल करणाऱ्यांना माहित आहे की दंगल केल्यास (PM Narendra Modi) त्यांच्या सात पिढ्यांना दंड भरावे लागेल. मुख्यमंत्री योगी म्हणाले, की २०१४ पूर्वी अनेक राजकीय पक्षांचा सर्वांची साथ आणि कुटुंबाचा विकास असा अजेंडा होता. ते स्वतःचा आणि कुटुंबाच्या विकासाव्यतिरिक्त कशाचाही विचार करु (Uttar Pradesh) शकत नव्हते. पूर्वीचे सरकारे दंगलखोरांना आश्रय देत होते. ते त्यांना सर्वप्रकारे पुढे जाण्यास मदत करत होते. आल्या दिवशी संचारबंदी लावली जात होती.

File photo of Yogi Adityanath
अशोक चव्हाणांनी खतगावकरांचे केले स्वागत! म्हणाले...

बहुसंख्यांक समाज त्याचा शिकार होत होता. जे मूर्ती बनवत होते त्यांची मूर्ती दिसत नव्हती. जे दिवे बनवत होते त्यांचे दिवे तोडले जात होते आणि सणोत्सव अंधारात साजरे होत होते. गेल्या साडेचार वर्षांमध्ये युपीत एकही दंगल झाली नाही. दंगलखोरांना पूर्वीच इशारा देण्यात आला आहे, असे योगी यांनी सांगितले. कोविडमुळे मरण पावलेल्या कुटुंबीयांना लवकर मदत निधी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन आणि योग्य अहवाल तयार करण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com