CM Yogi Adityanath: सीएम योगींचा सिंगापूर आणि जपानमध्ये 'रोड शो'; अनेक मंत्रीही जाणार सोबत, हे आहे मोठे उद्दिष्ट..
Yogi Adityanath’s International Roadshow: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंगापूर आणि जपानमध्ये रोड शो आयोजित करून विदेशी कंपन्यांना उत्तर प्रदेशमध्ये उद्योग सुरू करण्याचे निमंत्रण देतील. राज्यातील औद्योगिक धोरणे सुलभ करून औद्योगिक केंद्र स्थापन करण्यावर भर दिला जात आहे.
उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला 'वन ट्रिलियन डॉलर' (One Trillion Dollar) पर्यंत नेण्यासाठी आणि विदेशी कंपन्यांना राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी आकर्षित करण्याकरिता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः परदेश दौऱ्यावर जाणार आहेत.