CM Yogi Adityanath: योगींची 'सिंगापूर-जपान वारी' सुपरहीट! अडीच लाख कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख नोकऱ्या; पाहा युपीला काय मिळालं?
Investment Proposals and MoUs Secured: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सिंगापूर-जपान दौरा सुपरहीट ठरला; २.५ लाख कोटींच्या गुंतवणुकीवर करार, ५ लाख नोकऱ्या तयार. जपानमध्ये ग्रीन हायड्रोजन, रोबोटिक्स व ऊर्जा क्षेत्रात, सिंगापूरमध्ये फिनटेक व लॉजिस्टिक्समध्ये मोठ्या गुंतवणुकीस संधी.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा अत्यंत यशस्वी ठरला आहे. या दौऱ्यातून त्यांनी केवळ गुंतवणूकच आणली नाही, तर राज्यातील तरुणांसाठी रोजगाराची मोठी कवाडेही उघडली आहेत.