Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal

योगी आदित्यनाथ २५ मार्चला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

शपथ विधीचा कार्यक्रम असेल विशेष

लखनौ : योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ २५ मार्च रोजी घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या वेळेस भाजप सरकार बनवत आहे. २५ मार्च रोजी लखनौत शहीद पद येथील इकाना स्टेडियममध्ये शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम विशेष असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्र सरकारचे मंत्री, भाजपशासित (BJP) राज्यांचे मुख्यमंत्री, संघ आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी शपथ विधी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. शासनाने इनका स्टेडियममध्ये प्रस्तावित शपथ विधी कार्यक्रमासाठीची तयारी सुरु केली आहे. (Yogi Adityanath Will Take Oath As Chief Minister On 25th March)

Yogi Adityanath
महाविकास आघाडीतील आमदार आपल्या संपर्कात,भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा दावा

योगी मंत्रिमंडळाच्या शपथ विधी कार्यक्रमात बसपा प्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. माहिती विभागाचे अपर मुख्य सचिव नवनीत सेहगल यांनी सांगितले की इकाना स्टेडियममध्ये शपथविधीचा कार्यक्रम होईल.

Yogi Adityanath
पावसात भिजूनही ५४ च्या वर जाता आले नाही, पडळकरांची शरद पवारांवर टीका

लाभार्थीही होणार सहभागी

योगी सरकारच्या शपथ विधी कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. लखनौसह जवळपासच्या जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना शपथविधी कार्यक्रमात आणले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com