World Environment Day: वाढदिवशी योगींची मोठी घोषणा! एका दिवसात लावणार तब्बल ५ कोटी झाडे; कुकरैल जंगलातून होणार महाअभियानाचा श्रीगणेशा

World Environment Day Marks Massive Plantation Drive in UP: वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात एका दिवसात ५ कोटी झाडे लावण्याच्या महाअभियानाची घोषणा केली.
World Environment Day

World Environment Day

esakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज (५ जून २०२६ रोजी) आपला ५४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. विशेष आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे, यंदा त्यांचा वाढदिवस 'जागतिक पर्यावरण दिनाच्या' (World Environment Day) दिवशीच आला आहे.

या दुहेरी आणि खास मुहूर्तावर मुख्यमंत्री योगी यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशातील जनतेला पर्यावरण संरक्षणाचा एक मोठा संदेश दिला आहे. त्यांनी संपूर्ण राज्यात 'एक पेड़ मां के नाम' या महाअभियानांतर्गत राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्याची घोषणा केली आहे.

आपल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी भावूक आवाहन करत म्हटले आहे की, "राज्यातील प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी रोपटे लावून आपली मातृभूमी, मातृशक्ती आणि निसर्गाप्रती असलेल्या कर्तव्याचे पालन करावे आणि हरित, स्वच्छ व समृद्ध उत्तर प्रदेशच्या निर्मितीमध्ये आपले योगदान द्यावे."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com