Yogi government salary withheld

Yogi government salary withheld

ESakal

Employees Salary: सुमारे ६८,००० कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले, राज्य सरकारचा आक्रमक निर्णय, कारण आलं समोर, प्रकरण काय?

Property Disclosure Rule: उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मालमत्तेची माहिती न दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणानुसार योगी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.
Published on

उत्तर प्रदेशातील योगी सरकार राज्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी काम करत आहे. सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून मालमत्तेचा तपशील मागवला होता. काहींनी तपशील सादर केला, तर ६८,००० कर्मचाऱ्यांनी सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. योगी सरकारने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे ६८,००० कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com