
गोरखपूर : ज्यांनी महाकुंभला मृत्युकुंभ संबोधले होते त्यांना होळीतील दंगली रोखण्यात अपयश आले, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. गोरखपूर येथील प्रेसक्लबच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी समारंभानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.