Voter ID: मतदानकार्ड नाही तरी करता येते मतदान! कोणते डॉक्युमेंट आहेत आवश्यक? जाणून घ्या

तुमच्याकडील मतदानकार्ड (voter card) हरवले असल्यास किंवा सध्या तुमच्याकडे मतदान कार्ड नसल्यास तुम्ही मतदान करु शकता का? या प्रश्नांचं उत्तर आपण जाणून घेऊया.
Voter ID
Voter IDEsakal

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) प्रक्रिया सुरु आहे. देशात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. १८ वर्षांपुढील सर्वांनी मतदान करावे असं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. तुमच्याकडील मतदानकार्ड (voter card) हरवले असल्यास किंवा सध्या तुमच्याकडे मतदान कार्ड नसल्यास तुम्ही मतदान करु शकता का? या प्रश्नांचं उत्तर आपण जाणून घेऊया.

मतदान करण्यासाठी मतदाराजवळ मतदानकार्ड किंवा इलेट्रॉनिक ओळख पत्र असणं आवश्यक आहे. पण, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, तुमचं मतदानकार्ड हरवलं असलं तरी तुम्ही मतदान करु शकता. त्यामुळे तुमच्याकडे मतदानकार्ड नसले किंवा हरवले असले तरी तुम्ही मतदान केंद्रावर (polling booth) जाऊन मतदान करायला हवं.

Voter ID
EVM वर मोदींचा फोटो नाही, मतदान करणार नाही! महिलांचे प्रेम पाहून PM मोदींच्या डोळ्यात अश्रू

मतदानकार्ड नसले तरी तुम्ही मतदान करु शकतात. यासाठी फक्त तुमचे नाव मतदार यादीमध्ये असायला हवे. तुमच्याकडे मतदानकार्ड नसले तरी पुढील पैकी कोणतंही एक ओळखपत्र तुमच्याकडे असल्यास चालू शकेल.( if you do not have a voter card )

कोणते डॉक्युमेंट आवश्यक

१.पासपोर्ट

२. आधारकार्ड

३. पॅनकार्ड

४. ड्रायव्हिंग लायसेन्स

५. मनरेगा कार्ड

६. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आयडी कार्ड

७. फोटोसहित पेंशन कार्ड

(Required documents)

Voter ID
Loksabha Election Voting : दुसऱ्या टप्प्यासाठी आज ‘मतसंग्राम’ ; राज्यातील आठ मतदारसंघांत मतदान

मतदान यादीमध्ये नाव नसल्यास काय कराल?

जर तुमचे मतदारयादीमध्ये नाव नाही तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करु शकता. त्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत (https://old.eci.gov.in/files/file/4843-form-6-application-form-for-new-voters/) वेबसाईटवर जावे लागेल आणि फॉर्म ६ भरावा लागेल. याठिकाणी तुम्हाला व्यक्तिगत माहिती भरावी लागेल आणि काही कागदपत्रे डाऊनलोड करावे लागतील.

ऑफलाईन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला नोंदणी कार्यालयातून अधिकाऱ्यांकडून फॉर्म ६ घ्यावा लागेल. या फॉर्मसोबत तुम्हाला आपले आधारकार्ड पॅनकार्ड, वीजबिल, रेशन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर तुमचे नाव मतदार यादीमध्ये येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com