सॅम पित्रोडा यांना लाज वाटली पाहिजे; देशाची जाहीर माफी मागावी : राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

"सॅम पित्रोडा यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे,'' असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले. 

खन्ना (पंजाब ः "सॅम पित्रोडा यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे,'' असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले. 

फत्तेगड साहिबमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार अमर सिंग यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची आज येथे सभा झाली. शिरोमणी अकाली दलाचे डी. एस. गुरू त्यांच्या विरोधात रिंगणात आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हेही या वेळी उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, ""1984च्या शीख दंगलीबाबत पित्रोडा जे म्हणाले ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी देशाची माफी मागावी. हे मी त्यांनाही दूरध्वनीवरून सांगितले आहे.'' 

1984च्या दंगलींचे काय घेऊन बसलात? ती तर घडून गेली आहे, "हुआ तो हुआ'. मोदींनी गेल्या पाच वर्षांत काय केले ते देशाला सांगावे,'' असे वक्तव्य पित्रोडा यांनी केले होते. या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

"ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. 1984मधील दंगलीतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. पित्रोडा किंवा इतर कोणीही व्यक्त केलेले मत हे कॉंग्रेस पक्षाचे मत नाही. कोणत्याही व्यक्ती, संघटनेविरोघात, त्यांच्या धर्म, रंगाच्या आधारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला आमचा विरोध आहे,'' असे पत्रक काढून कॉंग्रेसने त्यापासून हात झटकले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You Should Be Ashamed Rahul Gandhi To Sam Pitroda For 1984 Remark