Crime News: कॉलवर वडिलांची मागितली माफी, तरुणाने व्हिडिओ बनवून संपविले जीवन; पत्नी आणि सासूवर केले गंभीर आरोप
Crime News : व्हिडिओमध्ये अभिषेकने त्याच्या आईवडिलांची माफी मागितली आहे. त्याने त्याच्या आत्महत्येसाठी त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांना जबाबदार धरले आहे. अभिषेकने आरोप केला की, त्याचे सासरचे लोक त्याचा छळ करतात.
पत्नीच्या छळाला कंटाळून बेंगळुरू येथील एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांनी जीवन संपविले. यांनतर पत्नींच्या छळामुळे पतींनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.