Punjab Crime : 4 तरूणींनी मिळून युवकाचं केलं अपहरण; हातपाय बांधून केला बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Punjab Crime : 4 तरूणींनी मिळून युवकाचं केलं अपहरण; हातपाय बांधून केला बलात्कार

चंदीगढ : महिलांवर अत्याचार किंवा बलात्कार झाल्याच्या अनेक घटना घडल्याचं आपण ऐकलं असेल पण तरूणावर आत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील जालंधर येथे घडली आहे. चार मुलींनी मिळून बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरूणाने केला आहे. तर आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची लाज वाटत असल्यामुळे त्याने तत्काळ तक्रार दिली नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

(Young men raped by four young girl)

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

अधिक माहितीनुसार, पीडित तरूणाचे लग्न झाले असून त्याला दोन मुले देखील आहेत. तो एका खासगी कंपनीत काम करत आहे. सोमवारी कामावरून परत येत असताना चार तरूणींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याचे अपहरण केले. त्याच्या तोंडावर स्प्रे मारल्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याच्यावर बलात्कार केल्याचं त्याने तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा: Video : गावरान गायीने केली ड्वेन जॉनसनची नक्कल; तो म्हणाला ,"ही अपेक्षा नव्हती"

तो ज्यावेळी शुद्धीवर आला त्यावेळी तो एका कारमध्ये होता. त्याचे हातपाय बांधले असल्याचं त्याने सांगितलं आहे. तर त्यानंतर तो घरी आला पण बदनामीच्या भितीने त्याने पोलिसांत तक्रार देण्याचं टाळलं होतं. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांकडून त्या चार तरूणींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :crimerape news