Video: अन् त्याच्या चेहऱयालाच लागली आग

वृत्तसंस्था
सोमवार, 6 एप्रिल 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 5) जनतेला 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावत एकतेचं प्रदर्शन करण्याचे आवाहन केले होते. यावेळी एका युवकाने तोंडात रॉकेल धरून आगीचे लोळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या चेहऱयालाच आग लागली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

उज्जैन (मध्य प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 5) जनतेला 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावत एकतेचं प्रदर्शन करण्याचे आवाहन केले होते. यावेळी एका युवकाने तोंडात रॉकेल धरून आगीचे लोळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या चेहऱयालाच आग लागली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video: कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजप नेत्याचा हवेत गोळीबार...

मोदींनी केलेल्या आवाहनला देशातून मोठा प्रतिसाद मिळाला. पण, काही अतिउत्साही नागरिकांनी नको ते पराक्रम केल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत.  शहरामध्ये रविवारी रात्री एक युवक तोंडातून आगीचे लोळ काढत होता. पण, अचानक त्याच्या चेहऱयाला आग लागली. ही घटना पाहून शेजारील नागरिकांनी धाव घेत त्याला वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गाबी हनुमान मंदिराजवळ राहणारा एक युवक तोंडात ज्वलनशील पदार्थ घेतले आणि आगीचे लोळ बाहेर काढू लागला. यावेळी, त्याच्या चेहऱयाला आग लागली. रहिवाशांनी त्याच्या तोंडात पाणी घालून वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संबंधित घटना युवकाच्या आयुष्यभर लक्षात राहिन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth fire after lighting lamp from mouth in ujjain viral video