Video: कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजप नेत्याचा हवेत गोळीबार...

वृत्तसंस्था
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोरोना व्हायरसला पळवून लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्याने हवेत गोळीबार केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

बलरामपूर (उत्तर प्रदेश): कोरोना व्हायरसला पळवून लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्याने हवेत गोळीबार केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

Video:कोरोना हरेल...माझा देश जिंकेल...!

जगभरात कोरोना व्हारसने धुमाकूळ घातला आहे. देशात हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शिवाय, कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी (ता. 5) रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवा, मेणबत्ती पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी दिव्यांच्या प्रकाशात यावेळी संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता. मात्र, दुसरीकडे बलरामपूर इथे कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजू तिवारी यांनी थेट हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp woman district president manju tiwari balrampur shot in air to escape corona