Video: XXXL आकाराची सापडली शेंग...

वृत्तसंस्था
Friday, 23 October 2020

एखादी शेंग केवढी मोठी असू शकते, याचा आपल्याला अंदाज आहे. पण, एका हिरव्यागार मोठ्या शेंगेचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या शेंगेला XXXL आकाराची शेंग असे म्हटले आहे.

नवी दिल्लीः एखादी शेंग केवढी मोठी असू शकते, याचा आपल्याला अंदाज आहे. पण, एका हिरव्यागार मोठ्या शेंगेचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या शेंगेला XXXL आकाराची शेंग असे म्हटले आहे.

काव्य अझमान याने ट्विटरवरून शेंगेचे छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे. अनेकांना ही शेंग खोटी वाटू शकते, असे मजेशीर शीर्षकही या छायाचित्रांना देण्यात आले आहे. एका २३ वर्षीय मुलाला शेतात ही भलीमोठी शेंग सापडली आहे. या शेंगेचे छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. भलीमोठी शेंग पाहून अनेकजण आश्यर्चचकित होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth shared giant petai picture video goes viral