माजी मुख्यमंत्र्यांचा बहिणीसोबत मालमत्तेवरून वाद, बहिणीसह आईला वडिलोपार्जित बंगल्यात जाण्यापासून रोखलं

YS Jagan and Sharmila Property Dispute बंगळुरू पोलिसांनी शर्मिला यांचा ताफा एअर फोर्स क्रॉसजवळ अडवला. यावेळी शर्मिला यांनी हे आपल्या कुटुंबाचे घर असल्याचे सांगत पोलिसांना जाब विचारला. यावरून आता वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
YS Sharmila Denied Entry to Family Bungalow in Bengaluru

YS Sharmila Denied Entry to Family Bungalow in Bengaluru

Esakal

Updated on: 

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि त्यांची बहीण वायएस शर्मिला यांच्यातील मालमत्तेचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बंगळुरूमधील येलहंका येथील कौटुंबिक निवासस्थानावरून हा वाद सुरू आहे. रविवारी (२३ नोव्हेंबर) शर्मिला या आई विजयम्मा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह या घराकडे जात होत्या. मात्र कर्नाटक पोलिसांनी त्यांना घरात जाण्यापासून रोखले. न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत पोलिसांनी त्यांचा ताफा दुसऱ्या मार्गाने वळवला.

Loading content, please wait...