

Noida Car Accident 27 Year Old Dies After Delay In Rescue Claims AAP
Esakal
नोएडात २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराज मेहता याच्या अपघाती मृत्यू प्रकरणामुळे आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि बचावकार्यातील त्रुटी यामुळे समोर आल्यात. १६ जानेवारीला रात्री धुक्यात युवरात मेहताची कार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नाल्याच्या पाण्यात कोसळली. यावेळी घटनास्थळी प्रसासन आणि बचावपथक असूनही त्याला वाचवता आलं नाही असा आरोप होत आहे. दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने कारवाई करत नोएडा अथॉरिटीच्या सीईओंना निलंबित केलं. पण यावर आम आदमी पार्टीने आक्षेप घेतला आहे.