३८ बायका,८९ मुलं; जगातल्या सर्वात मोठ्या कुटुंब प्रमुखाचं निधन

३८ बायका,८९ मुलं; जगातल्या सर्वात मोठ्या कुटुंब प्रमुखाचं निधन

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून ओळख असलेल्या जिओना चाना यांचे रविवारी निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा (Mizoram Chief Minister Zoramthanga) यांनी जिओना चाना यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून दु:ख व्यक्त केलं आहे. जिओना चाना यांच्या पश्चात 38 पत्नी, 89 मुलं आणि 33 नातवंडं असा परिवार आहे. चाना यांचं घर चार मजली असून तब्बल 100 खोल्या आहेत. सर्वजण एकत्रच राहतात. त्यामुळे हे कुटूंब पर्यटकांचे आकर्षण ठरते.

रविवारी दुपारी तीन वाजता जिओना चाना यांनी उपचारादरम्यान आयजोल येथील ट्रिनिटी रुग्णालयात अखेरचा श्वस घेतला. मागील काही दिवसांपासून ते मधुमेह आणि हायपरटेंशन या आजाराशी लढत होते. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरथथांगा यांनी ट्विट करत म्हटलेय की, 'जिओना चाना यांचं निधन झालं आहे. मिझोरम आणि बकटावंग तलंगनुम मधील त्यांचे गाव त्यांच्या कुटूंबामुळं पर्यटनाचे प्रमुख आकर्षण बनले होते, ' असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

21 जुलै 1945 रोजी चाना यांचा जन्म झाला होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला होता. चाना कुटुंब चार मजली इमारतीत एकत्र राहतं. त्यांच्या घराला 'चुआ थार रन' असं म्हटलं जाते. प्रत्येक मुलाच्या कुटुंबाला स्वतंत्र खोली आहे. मात्र, एकाच स्वयंपाक खोलीत सर्वांसाठी जेवण तयार केलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com