
Zomato Boy video Viral : वडिलांच्या अपघातानंतर सात वर्षीय मुलावर आलीय ही दुःखद वेळ
Zomato Delivery Boy video Viral सात वर्षीय मुलगा झोमॅटो डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) काम करतो. रात्री ११ वाजेपर्यंत सायकलने ग्राहकांना जेवण पोहोचतो. तसेच सकाळी शाळेत जातो. हे दुःखद पण प्रेरणादायी आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडिया वापरकर्त्याने शेअर केला आहे. हा मुलगा इतक्या लहान वयात कामाला का लागला हे जाणून घेऊ या...
हा सात वर्षांचा शाळकरी मुलगा वडिलांचे काम करीत आहे. कारण, त्याच्या वडिलाचा अपघात झाला होता. यामुळे मुलगा सकाळी शाळेत जातो आणि सायंकाळी सहा वाजल्यानंतर झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. ‘या मुलाच्या ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या वडिलाला पुन्हा एकदा झोमॅटोमध्ये काम करण्यास मदत करण्याची गरज आहे’ असे व्हिडिओ शेअर करणाऱ्याने लिहिले आहे.
हेही वाचा: फडणवीसांप्रमाणेच भाजप पुन्हा आश्चर्यचकित करणार; ‘या’ दोन नावांचा समावेश
व्हिडिओमध्ये सात वर्षीय मुलाशी संवाद साधताना ऐकू येतो. सायंकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत सायकलने घरोघरी जाऊन जेवण देतो, असे एका हातात चॉकलेट आणि दुसऱ्या हातात फोन घेतलेल्या मुलाने सांगितले. या ट्विटर व्हिडिओला ४१ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक वापरकर्त्यांनी मुलाच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
हेही वाचा: नवऱ्यासाठी हव्यात तीन तीन मुली; बायकोने स्वतः दिली जाहिरात
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोनेही (Zomato) प्रतिसाद दिला. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीला मुलाच्या वडिलांचा तपशील शेअर करण्याची विनंती केली. ३० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये (Video viral) मुलाने डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याचे कारण सांगितले. हा व्हिडिओ १ ऑगस्ट रोजी रात्री १०:४७ वाजता शेअर करण्यात आला आहे.
झोमॅटोने मुलाच्या वडिलांचे डिलिव्हरी खाते गोठवले आहे. ज्यामुळे मुलगा वडिलांच्या जागी काम करू शकणार नाही. झोमॅटोने मुलाला आणि वडिलांना शक्य ती सर्व मदत देण्याबाबतही सांगितले आहे. मुलाला आणि त्याच्या वडिलांना उभे राहण्यास मदत करा, असेही व्हिडिओ शेअर करणाऱ्याने म्हटले आहे.
Web Title: Zomato Delivery Boy Seven Year Old Boy Video Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..