बीफ आणि डुकराच्या मटणावरून झोमॅटो नव्या वादात 

वृत्तसंस्था
Sunday, 11 August 2019

झोमॅटो आणि वाद हे आता एक समीकरणच झाले आहे. आठवडाभरापूर्वीच एका ग्राहकाला दुसऱ्य़ा समाजाचा डिलिव्हरी बॉय नको होता म्हणून या ग्राहकाने ऑर्डर रद्द केल्याचा वाद शमत नाही तोच झोमॅटो पुन्हा नव्या वादात सापडला आहे. पश्चिम बंगालमध्ये झोमॅटोविरोधात त्यांचे डिलिव्हरी बॉयनीच आंदोलन छेडले आहे. 

कोलकाता : झोमॅटो आणि वाद हे आता एक समीकरणच झाले आहे. आठवडाभरापूर्वीच एका ग्राहकाला दुसऱ्य़ा समाजाचा डिलिव्हरी बॉय नको होता म्हणून या ग्राहकाने ऑर्डर रद्द केल्याचा वाद शमत नाही तोच झोमॅटो पुन्हा नव्या वादात सापडला आहे. पश्चिम बंगालमध्ये झोमॅटोविरोधात त्यांचे डिलिव्हरी बॉयनीच आंदोलन छेडले आहे. 
 

झोमॅटोने पश्चिम बंगालमध्ये बीफ आणि डुकराचे मटणाची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे झोमॅटोवर कर्मचारी नाराज झाले आहेत. यामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याचे म्हणत कर्मचाऱ्यांकडून झोमॅटो बीफ, डुकराचे मांसाचे पदार्थ जबरदस्तीने डिलिव्हर करण्यास लावले जात असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी कर्मचाऱ्य़ांच्या मागण्या ऐकत नाही. याविरोधात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zomato food delivery boy's on an indefinite strike protesting against delivering beef and pork