
ऑनलाइन मागवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये अनेकदा वेगळेच पदार्थ आल्याचे प्रकार नवे नाहीत. इतकंच काय तर खाद्यपदार्थात किडे, उंदीर, पालही आढलल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता एका व्यक्तीनं झोमॅटोवरून सॅलड ऑर्डर केलं होतं. जेव्हा सॅलड हातात मिळालं तेव्हा बॉक्स उघडताच व्यक्तीला धक्का बसला. त्यात जिवंत अळी दिसल्यानंतर व्यक्तीने व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर शेअर केलाय. आता यावरून झोमॅटोच्या सर्विसवर टीका केली जात आहे.